ठाणे

बारवी धरणामुळे बुडितक्षेत्राखाली येणाऱ्या तांडेली व काचकोळी गावात जनजागृती मोहिम…

डोंबिवली : ( शंकर जाधव ) ठाणे जिल्हयाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये यंदा संपूर्ण पाणीसाठा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत बारवी धरणाच्या सांडव्यावर ११ गोडबोले ( केंद्र ) पध्दतीचे दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यामुळे धरणात अतिरिक्त पाणीसाठा होत नव्हता. यंदा धरणात ३४०.७८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा करण्यात येणार आहे. यामुळे काचकोळी व तोंडली ही गावे व परिसर संपूर्ण जलमय होणार आहे. यंदा शंभर टक्के पाणीसाठा करण्याच्या उददेशाने औद्योगिक विकास महामंडळाने परिसरातील गावांमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करुन स्थलांतर करण्याचे आवाहन केले जात आहे.

बारवी धरणामुळे तांडेली व काचकोळी ही गावे पूर्ण पाण्याखाली जाणार आहेत. काचकोळी गावातील ग्रामस्थ  स्थलांतर करण्यास तयार आहेत.आगामी पावशाळ्यापूर्वी ज्यांचीघरे बांधून होतील ते गावकरी स्थलांतर करत असून उर्वरित कुटुंबांना भाडे देऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे  तांडेली गावातील काही ग्रमस्थांना नुकसान भरपाई वाटप सुरु असून येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होइ्र्रल असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.बारवी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या तांडेली व काचकोळी ही गावे संपूर्ण बुडिताखाली येणार असून मोहघर,सुकाळवाडी या गावांचे संपूर्णपणे स्थलांतर झाले आहे. तर मोहघर गावाला धोका नाही.या एकूण ६ गावे व ५ पाडयातील १२०४ कुटुंबे पुनर्वसनासाठी पात्र ठरवण्यात आली असून ६०५ कुटुंबांना मोबदला देण्यात आला आहे. काचकोळी व तांडेली गावातील सुमारे ३५१ कुटुंबाना मोबदला दिला जात आहे. फक्त तोंडली गावाचे पुनर्वसन रखडले असून येत्या पावसाळ्यायापूर्वी त्या गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून काही ग्रमस्थांचे मन वळवण्यात येत आहे.यासाठी बाधित होणाऱ्या तांडेली व काचकोळी परिसरातील गावातील ग्रमस्थांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. बारवी धरणामध्ये यंदा कोणत्याही परिस्थीत दुप्पट पाणीसाठा करण्याचे वरिष्ठांचे आदेश असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बाधित होणाऱ्या गावांमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करुन स्थलांतर करण्याचे आवाहन केले जात असल्याची माहिती बारवी धरण कार्यकारी अभियंता प्रकाशा चव्हाण यांनी दिली

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!