ठाणे

अंबरनाथमध्ये नालेसफाईच्या कामाला वेगाने सुरुवात

अंबरनाथ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  :  काही दिवसातच पावसाचे आगमन होणार असल्याने पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये या हेतूने अंबरनाथ नगरपालिका प्रशासन सज्ज असून अंबरनाथ शहरातील छोट्या नाल्यांची जेसीबी साहाय्याने साफसफाई करण्यात येत असून ज्या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळाच्या साहाय्याने सफाई केली जाणार आहे व सदर काम हे ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी वेगाने करावे. अशा सूचना ठेकेदाराला करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सुरेश पाटील यांनी सांगितले.
                     अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर व मुख्याधिकारी देविदास पवार यांनी नुकतीच नगराध्यक्षांच्या दालनात आढावा बैठक घेऊन शहरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात करावी व निघणाऱ्या गाळाची विल्हेवाट तातडीने लावावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने अंबरनाथ शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या नाल्यांची जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करण्यात सुरुवात केलेली असून संजयनगर येथीलही नाल्याची साफसफाई करण्यात आली. नालेसफाईच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आलेली असून नाल्यातून निघणारा गाळ हा देखील लवकरात लवकर उचलण्यास संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळाच्या साहाय्याने सफाई करण्यात येणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!