डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण पूर्वेत राहणार्या एका किन्नरची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात सुशील भालेराव या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे .रेवा देसाई असे मयताचे नाव असून सुशील भालेराव याचे त्याच्यावर प्रेम होते मात्र संशयातून त्याने रेवा च हत्या केली .
कल्याण पूर्व काटेमानवली आंबेडकर चौक शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा धीरज साळवी उर्फ रेवा देसाई हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते .या प्रेमप्रकरणातून सुशील त्याच्या संशय घेत रेवा याला कायम मारहाण करत होता तीन दिवसापासून रेवा याच्या घराला कुलूप होते काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घराची मालकीनीच्या मुलीने रेवा याला आवाज दिला प्रतिसाद न दिल्याने तिने घरात डोकावून पाहिले असता रेवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली याबाबत त्यांनी कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली पोलीसनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला .धारदार शस्त्राने रेवा यांच्या शरीरावर वार करण्यात आल्याचे निदर्शंनास आले .मृतदेह कुजल्याने दोन दिवसापूर्वी रेवा ची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला .रेवा याच्या मैत्रिणीने रेवाच्या भावाला रेवा ने १६ मे रोजी फोन करत माझी तब्येत बरी नसूनसुशील माझ्याकडे आला आहे संशय घेवून मला मारहाण करत असल्याचे सांगीतले होते .याबाबत रेवा च्या भावाने कोलशेवाडी पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी सुशील भालेराव विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला अखेर पोलिसांनी आज सकाळी सुशील ला अटक केली आहे