ठाणे : दि १९ मे २०१९ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई काव्यप्रेमी शिक्षक मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धा खडवली येथील स्वामी समर्थ मंदिरात पार पडली. सदर प्रसंगी अध्यक्ष म्हणून काव्यप्रेमी शिक्षक मंचचे, ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश साबळे, प्रमुख पाहुणे आणि परीक्षक मास्टर राजरत्न राजगुरू आणि प्रमोद बाविस्कर (सदस्य राज्य समिती काव्यप्रेमी शिक्षक मंच) आणि सावरकर समिती समन्वयक गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर प्रसंगी गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रास्ताविक केले. संमेलन अध्यक्ष राजेश साबळे यांनी सावरकर हे भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी परकीयांशी झुंजले. त्यांच्या त्यागातून दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरणा देणारे ठरले. त्यांच्या विचारांतून अनेक विचारवंत प्रेरणा घेऊन गेले. सावरकरांचे साहित्य अजूनही म्हणावे तसे लोकांपर्यंत पोहचले नाही, ही खंत आहे. शाळा कॉलेजमधून त्यांचे साहित्य पुढे येणे आवश्यक होते, तसे झाले नाही, म्हणून अनेकांना सावरकर कळलेच नाहीत. आजही साहित्यिकांची आणि साहित्याची अशीच दूरावस्था झाली आहे. आपण शिकलो म्हणतो पण अनेक शिकल्या सवरलेल्यांचे माय-बाप वृद्धाश्रमात आहेत. जो दीन बापडा आहे, ज्याला रोजच्या खाण्याची भ्रांत आहे, त्यांचे मायबाप त्यांच्या झोपडीत त्यांच्या जवळ आहेत. आपण कुत्री मांजरं पाळतो पण जन्मदात्याला विसरतो, ही खंतही साबळे सरांनी या प्रसंगी बोलून दाखविली आणि त्यांनी “जन्मठेप लिहिलं” ही कविता सादर केली आणि भर उन्हात कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व कवींचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी कल्पना म्हापुसकर, मंजू सराठे, शारदा खंदारे, किशोरी पाटील, शिवाजी घोरपडे, शैला गिरणारकर, प्रा. धनाजी बुटेरे, सागरराजे निंबाळकर, जयंत भावे, प्रविण खोलंबे, संजय जाधव, सचिन बागुल, चिंतामणी पावशे, रमेश तारमळे, संदीप मर्ढेकर, विजय फडणीस, विष्णू खांजोडे, उषा जाधव, दीपक थोरात इत्यादी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. मुकेश विशे यांनी आपले कौटुंबिक दुःख बाजूला सारून काव्य स्पर्धेचे सुंदर सूत्रसंचालन केले. सर्व सादर झालेल्या कवितांतून (प्रथम) प्रा. धनंजय बुटेरे, (द्वितीय) चिंतामणी पावशे, (तृतीय) सागरराजे निंबाळकर, (उत्तेजनार्थ) जयंत भावे, मंजू सराठे यांना तसेच सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काव्यप्रेमीं शिक्षक मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष-राजेश साबळे, काव्यप्रेमीं शिक्षक मंच राज्यसमिती सदस्य — प्रमोद बाविस्कर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समन्वयक -गुरुदत्त वाकदेकर, काव्यप्रेमीं शिक्षक मंच ठाणे जिल्हा सचिव — मुकेश विशे यांनी अथक परिश्रम घेतले.