डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे गुरुवार २३ मे रोजी मतदान मोजणी सुरू आहे.मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच डॉ.श्रीकांत शिंदे हे आघाडीवर होते.त्यामुळे ही एकतर्फी लढत आल्याचे बोलले जात आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ ५०.६०%, उल्हासनगर
५९.०८%, कल्याण पूर्व
५५.२६%, डोंबिवली
६६.३१% , कल्याण ग्रामीण
५७.७७% ,कळवा मुंब्रा
३७.०७% मिळाले होते.२०१९ च्या निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना यापेक्षाही जास्त मते मिळतील अशी अपेक्षा शिवसैनिकांना आहे.डोंबिवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर ढोल- ताश्याच्या गजरात गुलाल उधळत जल्लोष केला.