डोंबिवली :- (शंकर जाधव ) लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला आहे.गुरुवार २३ मे रोजी सायंकाळी डोंबिवली भाजप कार्यालयासमोर या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस नंदू जोशी, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिरवाडकर,माजी पदाधिकारी के.आर.जाधव, प्रकाश पवार, महिला पदाधिकारी पूनम पाटील, वर्षा परमार,निलेश पाटील,रावीसिंग ठाकुर, पंढरीनाथ पाटील, नगरसेवक निलेश म्हात्रे, संदीप पुराणिक यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ढोल-तश्याच्या गजरात जल्लोष साजरा केला.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर बेभान होऊन नाचले.थोडा वेळ भाजप कार्यकर्त्यांनी गरब्याचा फेर धरला होता.
हर हर मोदी घर घर मोदी नारा देत डोंबिवलीत भाजपचा जल्लोष..
May 23, 2019
59 Views
1 Min Read

-
Share This!