ठाणे

उद्योजकांचे ६०० कोटींचे वीज बिल माफ करा मग गरीबांचे बिल माफ करा..कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 डोंबिवली : ( शंकर जाधव  ) ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांचे ६०० कोटींचे वीज बिल माफ करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. यावर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त करत मग महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचेही वीज बिल करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी प्रतिनिधी नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.तसेच तसे न झाल्यास कॉंग्रेस जनतेला बरोबर घेऊन आंदोलनास बसू असा इशाराही दिला आहे.

२८ मे रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांचे ६०० कोटींचे वीज बिल माफ करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते.२०१४ पर्यत म्हणजे दरवर्षी सरकारच्या तिजोरीत ६०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.महाराष्ट्रातील जनताही वीज बिल आणि मालमत्ता कर भरत असते.या जनतेने काय पाप केले आहे ? त्यांचेही वीज बिल माफ करा.जर जनेतलाही हा नियम लागू करत नाही तर मग त्या उद्योजकांचे ६०० कोटींचे वीज बिल करू नका असे कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.जनतेला बरोबर घेऊन आंदोलनास बसू. या आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे

Attachments area

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!