कल्याण :- ( शंकर जाधव ) घरापर्यंत ये-जा करण्यासाठी रस्त्याच नसल्याने कल्याण पूर्वेकडील मातृछाया कॉलनी मधील रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने या रस्त्याचे काम सुरु केले मात्र अर्धवट अवस्थेत हे काम सोडले याबाबत पाठपुरवा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर रहिवाशांनी व आपच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण छेडले. मात्र आठ दिवस उलटूनही प्रशासनाने लोकप्रतिनिधी नि ढुंकूनही बघितले नाही त्यामुळे संतापलेल्या या उपोषणकर्त्यां रहिवाशांनी पालिकेच्या भूमिकेचा निषेध करत मुंडण करत पालिकेचा श्राद्ध घातले.
कल्याण काटेमानिवली भागातील मातृछाया कॉलनीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्याने या कॉलनीतील रहिवाशांचा मुख्य रस्त्यावर येण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झाल्याने गटार झाकून त्यावरून पोहोच मार्ग बांधून देण्याची मागणी महापालिकेकडेकरण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने गटारावर रस्ता बांधून पोहोच मार्ग बनविण्याचे सुरु केलेले काम दुसऱ्याच दिवशी थांबविले. सदरचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याला महापालिका प्रशासन दाद लागून देत नसल्याने येथील रहिवाशांनी आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने पुना लिंक रस्त्यावरील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर मंगळवारपासून पूर्णवेळ साखळी उपोषण सुरु केले. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कडक उन्हामुळे उपोषणास बसलेल्या मनोज शेट्टी तर शुक्रवारी राजेश्वरी पांडेय या उपोषणकर्त्या महिलेला चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कडाक्याच्या उन्हात सुरु असलेल्या या उपोषणाकडे लक्ष देण्यास निगरगट्ट महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या . कडाक्याच्या उन्हात सुरु असलेल्या या उपोषणाकडे लक्ष देण्यास निगरगट्ट महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांनी आंदोलन तिव्र करण्याचा निर्णय घेत नागरिकांप्रती संवेदना मेलेल्या महापालिका प्रशासना विरोधात मुंडण करत श्राद्ध घातले. त्याउपरही प्रशासनाने न्याय न दिल्यास बुधवार पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष अॅड. धनजंय जोगदंड यांनी दिली.