डोंबिवली : ( शंकर जाधव ) महाराष्ट्र जिम्नास्टिक असोसिएशनच्या वतीने दिनांक २५ ते २६ मे रोजी श्रवण स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली येथे नववी ट्रंपोलिंग आणि ट्रबलीग जिम्नॅस्टिक राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये संपूर्ण भारतातून २०० खेळाडू सहभागी झाले होते.नेत्रदीपक अशा या खेळामध्ये सर्व संघांमध्ये एकेका गुणांनी चढाओढ होत होती. त्यामुळे ही स्पर्धा अधिक रंगतदार झाली. ट्रंपोलींग या खेळात डोंबिवलीतील भोईर जिमखाना येथील खेळाडूंनी तब्बल १९ पदकांची लयलूट करत महाराष्ट्राची शान वाढवली. तर ट्रंबलींग या खेळात सुद्धा ७ पदकांची कमाई करत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय विजेतेपदावर कोरले.
विजेत्यामध्ये सब ज्युनियर व जूनियर, सीनियर असे गट होते. सब ज्युनियर मुले यामध्ये आदित्य हिंगे याने वैयक्तिक एक रजत व एक सुवर्णपदक टीमसाठी मिळवले. तर सब ज्युनियर मुलींमध्ये राही पाखले हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक पटकावले. ज्युनियर मुली मध्ये अक्षता हिंगे हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक कमावले. तर ज्युनियर मुले या गटात विनायक ब्रीद याने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदकांची कमाई केली.तर आदर्श,प्रज्वल हिमांशू यांनी टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.सीनियर मुली या गटात श्रद्धा गावडे हिने वैयक्तिक रजत व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.तर वैदेही व सिद्धी यांनी टीमसाठी सुवर्णपदकांची कमाई केली. सीनियर मुले या गटात टीमसाठी श्रेयस व सेहुल यांनी सुवर्णपदक मिळवले. ट्रमबलींग या चित्तवेधक खेळात ज्युनिअर गटात किमया फुल गावकर हिने वैयक्तिक व टीम साठी सुवर्णपदकांची कमाई केली. तर काव्या बापट हिने वैयक्तिक रौप्य व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले तर सिनियर मुली कनिष्का भोईर हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.सुवर्ण पदक विजेत्यांना आगामी वर्ल्डकप मध्ये खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे सदर खेळाडूंचे प्रशिक्षक,पालक व संपूर्ण भोईर जिमखाना येथे आनंद व्यक्त होत आहे.खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन माजी आमदार रमेश पाटील,मुकुंद भोईर, दिलीप भोईर, पॉल पेरापेरी व मुख्य प्रशिक्षक पवन भोईर यांनी केले
ट्रंपोलिंग आणि ट्रबलीग जिम्नॅस्टिक राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश..
