आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम
डोंबिवली : ( शंंकर जाधव ) येत्या काही दिवसांतच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. प्रत्येक पालक आपापल्या पाल्यासाठी चांगल्या प्रकारच्या वह्या, पुस्तके, कपॉस बॉक्स, टिफिन, बॅग, पाण्याची बॉटल, गणवेश अश्या विविध आवश्यक सर्व वस्तू आपल्या पाल्यांना दुकानांतून त्यांच्या आवडी प्रमाणे घेऊन देतील. आपल्या पाल्याला सर्व सोयी सुविधा पुरवता याव्या यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतात. मात्र आदिवासी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन एक हात मदतीचा, एक हात जाणिवांचा या उद्देशाने काम करत आहे.
अशा वंचितांच्या जीवनात आविष्कार घडविण्यासाठी नुकतेच अनिल शर्मा आणि सरोज शर्मा यांनी दहा विद्यार्थ्यांना पुरेल एवढे नवीन स्कुल बॅग, कंपॉस बॉक्स, चित्रकला वही, रंग, पेन्सिल, रबर, वह्या, टिफिन बॉक्स, पॅड, पाणी बॉटल असे शैक्षणिक साहित्य अविष्कारला दिले. आविष्कारची टीम जून महिन्यातील दुसऱ्या आठयवड्यात या आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी जाणार आहे. तरी आपणही या मोहिमेचा एक भाग बानून आपण देऊ इच्छिणारे साहित्य आमच्यापर्यंत पोहचवू शकता, असे आवाहन आविष्कारच्या टीमने केले आहे. आपणही अशाप्रकारची मदत करू इच्छित असल्यास लवकर संस्थेशी संपर्क करावा, असे विनोद शेलकर आणि सचिन जाधव यांनी सांगितले. आदिवासींची अनेक मुले शिकण्याची तीव्र इच्छा असून परिस्थितीशी दोनहात करत अपुऱ्या शैक्षणिक साहित्या अभावी, चांगल्या शिक्षणापासून, कौशल्यांपासून वंचित राहतात. चित्रकलेचे साहित्य त्यांना माहीत नसते, एकाच वही मध्ये सर्व विषयाचे लिखाण वेगवेगळे भाग करून लिहिले जाते. जणू त्यांच्या नशिबाचे दुःखच जणू ते वाटून घेताना दिसतात. कधी पेन असतो तर कधी पेनाची कांडी नसते. कधी पायात चप्पल असते तर कधी नसते. तरी ही त्या दीन चेहऱ्यावर आनंदच दिसतो. अश्या या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या, अपुऱ्या सुविधांअभावी तडजोड करणाऱ्या मुलांसाठी आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनला सहकार्य करावे, असेही आवाहन विनोद शेलकर यांनी केले आहे.

|
|