प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धुम्रपानाचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो
महिलांचे धुम्रपानाचे व्यसन सुटण्यासाठी व्यसनमुक्त उपचारांची गरज तज्ज्ञ अधोरेखित करतात
डोंबिवली : ( शंकर जाधव ) गर्भावस्थेत धुम्रपान केल्यास बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते आणि जन्मजात वजन कमी असू शकते. निकोटिन हे गर्भवती महिलांसाठी आणि बाळाच्या वाढीसाठी नुकसानकारक असते. त्यामुळे बाळाच्या मेंदूवर आणि फुफ्फुसांवर दुष्परिणाम होऊ शकतो. पेडिअॅट्रिक्स या जर्नलमध्येप्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार प्रसूतीच्या आधी तीन महिने धुम्रपान करणाऱ्या आणि पहिल्या तिमाहीमध्ये धुम्रपान सोडलेल्यामातांमध्ये सडन अनएक्स्पेक्टेड इन्फंट डेथची (एसयूआयडी) (अचानक अनपेक्षित नवजात बालकाचा मृत्यू) शक्यता धुम्रपान नकरणाऱ्या महिलांच्या तुलनेने अधिक असते. त्यामुळे धुम्रपानकरणाऱ्या गर्भवती महिलांनी लगेचच धुम्रपान सोडून द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
फुफ्फुस विकार तज्ञ डॉ. संध्या कुलकर्णी माहिती देताना म्हणाल्या, खेडेगावातील बहुतांश महिला विड्या ओढतात. तसेच मशेरीने दात घासून त्याचे सेवन करतात. अशा महिलांनी विविध उपचारांच्या माध्यमातून आरोग्यास घातक सवयींपासून दूर राहिले पाहिजे. याकरिता समुपदेश, औषधोपचारांच्या मदतीने या व्यसनांनाकायमस्वरुपी प्रतिबंध करता येऊ शकतो. अशा व्यक्तींनी स्वतःलाव्यसनांपासून दूर ठेवण्याकरिता विविध कामांमध्ये स्वतःला गुंतवूनघेतले पाहिजे तसेच नवीन छंद जोपासले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला सिगारेटचे व्यसन सोडताना सतत कफ, खोकला, डोकेदुखी, लक्ष केंद्रीत करता न येणे, सतत सिगारेट ओढण्याची संधीशोधत राहणे आदी लक्षणे पहायला मिळतात. पण ही लक्षणे काही काळापुरताच मर्यादित असतात. तुमचे शरीर सिगारेट न ओढताही राहू शकते, याचे संकेत देणारी ही लक्षणे असून याकरिता घाबरून जाण्याचे कारण नाही. हे व्यसन सोडल्यास आई आणि बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्य होतात. त्यामुळे गरोदरपणामध्ये सिगारेट, विडी ओढण्याच्या व्यसनापासून दूर राहिल्यास आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.