डोंबिवली ( शंकर जाधव ) आजकाल चाळीशीतला तरुण दिवसभराच्या कामाने पार कोलमडून पडतो. मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही दिवसभर एखाद्या कंपनीत राबल्यानंतरही आपल्या शरीराची उत्तम ठेवण राखत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा लिलया जिंकणारे बदलापूरचे रहिवासी आणि ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणार्या जागतिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. दिनांक 20 ते 27 ऑक्टोबर 2019 रोजी युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस डेडलिफ्ट पॉवरलिफ्टिरंग स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये संजय दाभोळकर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी सुपरमॅक्स कंपनीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बदलापूर शहरात राहणारे आणि ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील सुपरमॅक्स कंपनीत सेवेत असलेले संजय दाभोळकर यांनी कंपनीत एका शिफ्टमध्ये काम करून पॉवर लिफ्टिींग स्पर्धेतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 82.5 ते 90 किलो वजनी गटात त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्यावर्षी जानेवारी 2018 मध्ये संजय दाभोळकर यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत 82.5 किलो वजनी गटात 125 किलोचे बेंच प्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. हरियाणामधील सोनिपत येथे युरोपमध्ये जाणार्या खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये नॅचरल स्ट्राँग पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत 26 मे 2019 रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये संजय दाभोळकर यांनी वयाच्या 53 व्या वर्षातही तरुणाला लाजवेल असा परफॉर्म करून 82.2 किलो वजनी गटात निवड झाली आहे.

दरम्यान, संजय दाभोळकर यांनी एबी फिटनेसच्या माध्यमातून बदलापूर-उल्हासनगर येथे रतन हेल्थ क्लबमध्ये पॉवर लिफ्टिंगचे क्लासेस सुरू केले आहेत. या क्लासमधील सात विद्यार्थ्यांचीही निवड भारतीय संघातर्फे करण्यात येत आहे. यामध्ये अजय संभाजी पवार, कुंदन कुमार मोरे, योगेश मखिजा, दिपक दिक्षित, लिना दिक्षित, अमित जगदीश मोटवानी, वर्षा रामटेके आदी विद्यार्थ्यांचा समावेश आ
|
|