ठाणे

खड्डेमुक्त अपघातमुक्त कल्याण-डोंबिवलीसाठी `आप`ची प्रशासन जनजागृती रॅॅली

डोंबिवली  : ( शंकर जाधव  )   गतवर्षी पावसाळ्यात कल्याण डोंबिवली महापालिका हद्द्दीतील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात घडले. यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.यंदा तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने नागरिकांना दर्जेदार खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी आंबेडकर उद्यान ते शिवाजी चौक अशी प्रशासन जनजागृती रॅॅली काढली. तसेच शिवाजी चौक येथे एक दिवसीय अन्नत्याग करत सायंकाळी सहाच्या सुमारास गत वर्षी रस्ते अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

गतवर्षी पावसाळ्यात पालिका हद्दीतील रस्त्यामधील असमतोलपणा ,खड्डे यामुळे अनेक अपघात झाले चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला .यंदा पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचा दावा केला असला त्रीआज हि अनेक ठिकाणी असमतोल उंचसखल रस्ते दिसून येत आहेत अनेक ठिकाणी सिमेंट च्या रस्त्यांमध्ये पडलेल्या गप अपघातांना निमंत्रण ठरत आहे .या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने या गंभीर बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी आज आज आंबेडकर उद्यान ते शिवाजी चौक अशी प्रशासन जनजागृती रली काढत शिवाजी चौक येथे एक दिवसीय अन्नत्याग करत सायंकाळी  सहा च्या सुमारास गत वर्षी रस्ते अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांना श्रधांजली वाहण्यात आली.यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्यांनी पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसाठी ३५ कोटीची तरतूद केली आहे. सदर कामे गुणवत्ता पूर्ण कशी होतील या कडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे यंदा नागरिकांना खड्डेमुक्त दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!