ठाणे दि. 31 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपेंद्र तामोरे , तहसीलदार सर्वसाधारण राजाराम तवटे , नायब तहसीलदार सिंधू खडे आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व्यसन मुक्तीची शपथही देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
May 31, 2019
23 Views
1 Min Read

-
Share This!