ठाणे : काल सायंकाळी 8.00 वाजेच्या सुमारास श्री बाबूलाल मस्के वय 40 वर्षे राहणार:- वारली पाडा श्रीनगर ठाणे हे त्यांच्या परिवारासह मूळ गावी बीड येथे जाण्याकरिता निघाले असता वारली पाडा येथून भाड्याची रिक्षाने बसून इंटरनिटी मॉल येथे खाजगी बस ने जाण्याकरता उतरले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या जवळ असलेली पर्स त्यामध्ये सहा तोळे सोने व 7000 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 2 लाखाचा ऐवज सदर रिक्षामध्ये विसरलेला आहे. त्यानी श्रीनगर पोलीस स्टेशन येथे येऊन झालेला प्रकार सांगितला असता सदर रिक्षाचा शोध घणे कामी एक पोलीस पथक तयार करून त्यांना रवाना केले असता सदर पोलीस पथकाने स्त्यावरील कॅमेर्याच्या मदतीने सदर रिक्षाचा नंबर मिळवून या नंबरची माहिती काढून दिनांक 31/05/ 2019 रोजी रिक्षा मालकाच्या घरी जाऊन सदर रिक्षा चेक करता सदर रिक्षात बाबूलाल मस्के यांची यांची विसरलेली पर्स मिळून आली असून त्यामध्ये असलेला दोन लाखाचा ऐवज मिळून आला आहे .
विसरलेले पर्समधील सहा तोळे सोने व 7000 रुपये रोख रक्कम असा दोन लाखाचा ऐवज सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तक विभाग ठाणे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आलेला आहे.