ठाणे

साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याची  धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानची मागणी

ठाणेः डासांपासून पसरणार्‍या मलेरीया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी 200 कंत्राटी कामगार ठेकेदाराच्या माध्यमातून नियुक्त करुन आयुक्त जयस्वाल यांनी  आपल्या  कारकिर्दीत खूप चांगले प्रयत्न केले होते. सद्यस्थितीत हे काम सप्टेंबर 2018 पासून म्हणजे गेले 9 महिने टेंडर प्रक्रियेत असल्याचे समजते. आपण ज्या वेळेस हे टेंडर सुरु होते त्यावेळी ते फक्त सहा महिन्यांसाठी होते. मात्र कामाची गरज लक्षात घेता आपण त्या कामाला तीन महिन्यांनी मुदतवाढ देऊन नव्याने दोन वर्षाचे काम करण्यासाठी टेंडर काढण्याच्या सुचना संबंधित आरोग्य विभागाला दिल्या होत्या. ते काम आजपर्यंत त्यांच्याकडून पूर्ण झालेले नाही. असे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठाने पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सदर निविदेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी जे काम करणे आवश्यक होते ते न करता आपल्या आदेश क्र. ठामपा/लेखा/मूलेविअ/आ—685, दि. 30/07/2018 अन्वये विना निविदा मुदत्वाधीचे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये असे आदेश दिलेले होते. तरीही संबंधित निविदा प्रक्रिया पूर्ण न करता 01/07/2018 पर्यंतसाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी हे काम आरोग्याशी निगडीत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या महत्वाच्या विषयात अधिकार्‍यांकडून चालढकल होत असल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक असलेल्या कोणत्याही कामाला आपल्या अधिकारात सुरु करता येत असताना संबंधित अधिकरी टक्केवारीच्या राजकारणात हा ठेका अडकवित असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन डासांपासून पसरणार्‍या मलेरीया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावापासून ठाणेकरांना दूर ठेवाल अशी आशा आहे. येत्या आठ दिवसात सदर काम सुरु करण्यात यावे अन्यथा आम्हाला अधिकार्‍यांच्या टक्केवारीसाठी भिकमांगो आदोलन करावे लागेल. असे प्रतिष्ठानने पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!