ठाणे

डोबिवलीतील सलाखा सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून बाग…. बच्चेकंपनीचा पुढाकार ….

 डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ओला कचरा–सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत पालिका प्रशासन आणि सामाजिक संस्थेकडून जनजागृती सुरु आहे.काही सोसायट्यांनी याकडे पाठ दाखवली असली तरी डोंबिवलीतील सलोखा सोसायटीने पर्यावरणाचा संदेश देणारे काम केले आहे.विशेष म्हणजे सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटीमधील काही बच्चेकंपनीने यात खारीचा वाटा उचलला आहे.सोसायटीमधील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करून झाडे जगवली आहे. कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी वर्षा शिखरे यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील  मानपाडा रोडवरील विजया बँकच्या जवळील सलोखा सोसायटीत कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी वर्षा शिखरे, गिरीश नेहते यासह सोसायटीमधील अर्पणा नेहते, रेवती महाजन, आदित्य सावंत या लहान मुलांनी सोसायटीमधील ओला कचऱ्यापासून खत तयार करतात. हे खत सोसायटीमधील झाडांना दिले जाते.ही लहान मुले या झाडांना पाणी देण्याचे काम नित्यनियमाने करतात.गेली चार वर्ष हे काम सुरु असून इतर सोसायटींनी अश्याच प्रकारचे काम केले तर पर्यावरणाचा संदेश जाईल आणि शहरातील कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल असे वर्ष शिखरे यांनी सांगितले.

 

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!