कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई चे आदेश दिले आहेत .या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु करण्यात आली आहे .पालिकेच्या `अ` प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेल्या टिटवाळा मांडा बल्याणी,अटाळी गाळेगाव, मोहना, शहाड आदी ठिकाणी अनधिकृतपणे चाळी उभारण्याचे पेव फुटले होते या ठिकणी अनधिकृतपणे चाळी उभारल्या जात असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी च्या पार्श्वभूमीवर पालिकेचे अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी सातत्याने अनधिकृत बांधकामा विरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे .काल दिवसभरात मोहने येथील १५ अनधिकृत बांधकामे ,शहाड बंदरपाडा येथे अनधिकृत पणे उभारण्यात आलेल्या २० खोल्या पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त करत या भागातील भूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे
मोहने शहाड परिसरात ३५ अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
June 6, 2019
29 Views
1 Min Read

-
Share This!