मुंबई : भांडूप पश्चिम चंदनवाडी व्हिलेज रोड परिसरात राकेश अंबादास पवार (३५) याची लोखंडी सूऱ्याने वार करून तिघांनी हत्या केली. हत्येनंतर तिघेही हल्लेखोर फरार असून भांडूप पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
भांडूप येथील महावीर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायचा. त्याचा भांडूपमधीलच काही लोकांसोबत वाद होता. या वादातूनच काल रात्री त्याच्यावर हल्ला झाला. ‘हल्ला झाला तेव्हा राकेशची प्रेयसी त्याच्यासोबतच होती, अशी माहिती राकेशचा मित्र गोविंद राठोड यानं दिली. या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.