डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात प्रभाग क्रमांक`ग`व`फ`प्रभाग क्षेत्रात आपत्कालीन कक्षात कर्मचारी वर्ग साहित्य नसल्याने नाराज झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्याने एखाद्या ठिकाणी आपत्कालीन परीस्थिती निर्माण झाल्यास ती परिस्थिती कशी हाताळावी असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.पालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेल्या वर्षी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावर आपत्कालीन कक्ष उघडण्यात आला होता.त्यावेळी पुरेसे साहित्य असल्याने येथील कर्मचारी काम करत होते. मात्र यावर्षी पावसाला सुरु होऊन हि आपत्कालीन कक्षात फावडा,रस्सी,कोयता यासंह अनेक साहित्य उपलब्ध नसल्याने कर्मचारी वर्ग नाराज झाले आहेत. एखाद्या ठिकाणी वृक्ष कोसळला तर साहित्याअभावी काम काम कसे करणार असा प्रश्न त्यांना पडला आहे. वास्तविक पावसाळा तोंडावर आला असताना आपत्कालीन कक्षात साहित्य पुरवणे आवश्यक असते.मात्र पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. नुकतेच नवीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची बदली झाली असून चंद्रकांत जगताप `ग` प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांची नियुक्त करण्यात आली आहे. मात्र त्यांनीही याकडे का लक्ष दिले नाही असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. तर अनेक वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील `ह`प्रभाग क्षेत्रात स्वतंत्र आपत्कालीन कक्ष नाही. सुरक्षा रक्षकांच्या टेबल हेच आपत्कालीन कक्ष आहे.