डोंबिवली : ( शंकर जाधव ) उत्तर प्रदेशातील अलिगडमधील तप्पल येथील अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेच्या निर्घृण हत्या झाली. या घटनेने देशभरात नागरिक संतप्त झाले आहेत. डोंबिवलीजवळील पलावा येथे ‘वी द पलावीयन्स’ यांनी कॅण्डल मार्च काढून या चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली.यावेळी भाजप डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पलावा निळजे भाजपचे उपाध्यक्ष मनोज पवार, कासा रिओचे अध्यक्ष सतिश सिंग, संदिप व्होटकर, धीरज शेट्टी, अनुज गुप्ता, प्रदिप बरनवाल, अँड.अनामिका विचारे, अली असगर, संजय भावेश, अमोलभैगले, सतरपालसिंग, रितेश, प्रविण, सोनिया, विभा, जी एस मलप्पा, सदानंद पुट्टा ,संतोष ,वल्लभ, कुष्ण मोहन पांडे, अशोक श्रीवास्तव हे पलावातील सामाजिक कार्यकर्ते यासह अनेक रहिवाशी सहभागी झाले होते.
पलावा काँलनीतील अंतर्गत भागातल्या मुख्य रस्त्यावर कॅण्डल मार्चला सुरुवात झाली.या महिला, तरुण, तरुणी, लहान मुले मुली, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.तसेच मुख्य रस्त्याने जात असताना पलावातील अनेक रहिवासी देखील यात सहभागी झाले.पलावातील अनेक प्रमुख ठिकाणी फिरुन श्री गणपती मंदिराच्या प्रांगणात मेणबत्ती लावून या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे स्तब्ध राहून तिच्या आत्म्याला शांती लाभण्याची प्रार्थना करण्यात आली.या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांनी मुलीच्या देहाची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एखादी व्यक्ती मुलीसोबत एवढी क्रूर कशी काय वागू शकते.आपण आपल्या मुलांसाठी कोणत्या प्रकारचं असुरक्षित विश्व तयार करीत आहोत.? त्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे.!’अश्या संतप्त भावना पलावातील रहिवासी यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळीअँड अनामिका विचारे यांनी आपली मुले कश्याप्रकारे असुरक्षित असल्याचे पलावातील घटनेचे उदाहरण देउन सांगितले. सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे