ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांची उत्तम कामगिरी
ठाणे : बंद घराचे टाळे उघडून 6 लाख 85 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने व अन्य ऐवज लांबवणाऱ्या महिलेला तुरुंगात धाडण्यात आले आहे. आरोपी महिला ही पूर्वी फिर्यादीच्या घरी मोलकरणी होती. मालक घरात नसल्याचे समजतात तिने डाव साधला होता. मात्र वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या 12 तासांत चोरीचा गुन्हा उजेडात आणला.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणारे भावेश प्रकाश मिर्गनानी हे 1 जून 2019 रोजी कामानिमित्त घराला टाळा लावून बाहेर गेले होते. दरम्यान, 3 जून 2019 रोजी भावेश घरी परतले असता त्यांच्या घराचे टाळे उघडे दिसले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता कपाटातील 6 लाख 85 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने, लहान मुलाचे घड्याळ चोरीला गेल्याचे भावेश यांच्या लक्षात आले. भावेश यांनी तात्काळ वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून घरात चोरी झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी (गु. र. क्र. 78/19) भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी वागळे इस्टेट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एक महिला संशयास्पदरीत्या फिरताना आढून आली. पोलिसांनी त्या महिलेचे फुटेज भावेश यांना दाखवले. ती महिला पूर्वी घरकाम करत असल्याचे भावेशने पोलिसांना सांगितले. मात्र ती महिला कोठे राहत होती, हे भावेश यांना माहित नव्हते. भावेश यांनी दिलेल्या त्या महिलेचा दिलेल्या मोबाईल नंबर संपर्क साधली असता फोन बंद होता. तांत्रिक माहितीच्यी आधारे माहिला पत्ता पोलिसांनी शोधून काढला. महिलेच्या शोधात पोलिसांचे पथक ठाण्यातील लोकमान्य परिसरात गेले असता तेथे एका लहान मुलाच्या हातात लहान मुलाच्या हातात चोरीला गेले घड्याळ दिसले. पोलिसांनी त्या मुलाच्या मागे मागे त्याच्या घर गाठले असता चोरी करणारी मिन्नती दुर्योधन गौडा (31) ही मूळगावी उडिसा येथे जाण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी मिन्नतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने भावेश यांच्यी घरात चोरी केल्याची कबुली दिली. पूर्वी घरकाम करताना भावेश यांच्या नकळत मुख्य दरवाजाच्या टाळ्याची एक चावी स्वत: जवळ ठेवल्याचे मिन्नतीने सांगितले. त्या चावीच्या सहाय्याने घरातील मुद्देमाल चोरल्याची कबुली तिने दिली.
या गुन्ह्याचा उलघडा परिमंडळ 5 चे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस नाईक के. सी. जाधव, पोलीस नाईक ए. के. बांगर, पोलीस नाईक ए. बी. खेडेकर, पोलीस शिपाई एन. एम. बांगर, पोलीस शिपाई एम. एस. राठोड, पोलीस शिपाई एल. सी. गावकर, महिला पोलीस शिपाई कविता चौधरी आदी पथकाने अवघ्या 12 तासांत केला.