ठाणे : इंगलंड येथे विश्वचषक बघण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षकांनी आगरी-कोळी टोप्या* परिधान करून सामन्याचा आनंद लुटला. दिवा गावातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंगलंड येथे विश्वचषक पाहण्यासाठी गेले असून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामना पावसामुळे रद्द झाल्याने या प्रेक्षकांनी भारत-पाक सामन्याचा मनमुराद आनंद लुटला आणि सामन्या दरम्यान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर झळकावले.सदर बॅनर वर “हिंदुस्थान के दो शेर” असे लिहिण्यात आले होते.
**************फोटो गँलरी***************
**************************************