ठाणे

पालिकेच्या रुग्णालयात ‘त्वचारोग रुग्णांची’ गर्दी

डोंबिवली :-  ( शंकर जाधव )  पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्वचारोग रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे त्वचारोग रुग्ण स्थानिक नसून कर्जत-कसारा परिसरातील  असल्याचे सांगण्यात आले
 कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्वचारोग तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण विभागातील त्वचारोग रुग्णांची गर्दी मागील दोन महिन्यांपासून होत आहे अशी माहित शास्त्रीनगर रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी दिली.

      महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तदाब आणि सर्दी-ताप आदींसाठी गोर-गरीब रुग्णांची गर्दी होत असते. त्वचारोग तज्ञ डॉ. संजय जाधव यांच्या विभागात दररोज सुमारे दीडशेहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या पाऊस पडत असल्याने भिजल्यामुळे  रुग्ण  मोठ्या प्रमाणत वाढत असल्याचे सांगण्यात आले  त्वचारोग बरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने रुग्ण पुन्हा-पुन्हा येत असतात. रुग्णालयात त्वचारुग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने आणखी  तज्ञ डॉक्टरांची गरज आहे असे त्वचारोग तज्ञा डॉ. जाधव यांनी सांगितले. पावसाळ्याला आता सुरुवात होत असून त्वचारुग्णांची अधिक वाढ होईल अशी चिन्हे  आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात अद्याप स्त्रीरोग, बालरोग, सर्जन, रेडीओलॉजीस्ट व सोनोलॉजीस्ट, पॅथॉलॉजीस्ट, फिजीशीयन अशा १३  तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय सहाय्यक प्रयोगशाळातंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टाफनर्स, लिपिक, कक्षसेवक, आया, पुरुष-सफाई कामगार, वाहनचालक अशा सुमारे १५०  पदे रिकामी आहेत. ही रिकामी पदे लवकरात-लवकर भरली गेली तर गोर-गरीब रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल असेही डॉ. सावकारे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!