ठाणे

पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचा डोंबिवलीत गुणगौरव सोहळा….

डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील ठाणे जिल्हा आगरी समाजाचे प्रगती महाविद्यालयामधील वरिष्ठ प्राध्यापिका आणि मुंबई विद्यापिठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्य डॉ.किशोरी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अर्चना प्रभुदेसाई,डॉ.वंदना बोरकर. डॉ.अनया मार्कडे, डॉ.प्रशांत शिंदे,डॉ.सितालक्ष्मी अय्यर, डॉ. अर्चना राव आणि यांना मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडी ( विद्यावाचस्पती ) पदवी प्रदान झाल्यबद्दल डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालयाच्या वतीने गुणगौरव सोहळा डोंबिवली जिमखाना येथे संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील. स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे.डॉ. नायर,पुष्पलता पाटील. डॉ. किशोरी भगत,डॉ.जगदीश भगत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  पीएचडी ( विद्यावाचस्पती ) पदवी प्राप्त प्राध्यापकांनी आपल्या मनोगतामध्ये पीएचडीसाठी घेतलेली मेहनत, कष्ट,समाजातील विविध स्तरांचे झालेले सहाय्य व आपले मार्ग डॉ. किशोरी भगत आणि डॉ. नायर यांचे आभार मानले. विविध क्षेत्रात आव्हाने येत असून त्यासाठी संशोधनाची गरज आहे.संशोधन करत असताना फक्त मार्गदर्शक यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभते. त्याचसोबत कुटुंबीयांची पीएचडी करताना लाखमोलाची मदत होत असल्याची भावपूर्ण शब्दात म्हणणे मांडले.या गुणगौरव सोहळ्याला पदवीधारकांचे नातेवाईक उपस्थित होते.यावेळी स्थायी समितीचे  माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले,सामाजिक समस्या असलेले विषय पीएचडीसाठी घेतलेले आहेत. त्याचा उपयोग समाजासाठी होऊ द्या.प्रत्येक राजकारण्याचे समाजात प्रश्न उरणार नाहीत.परंतु समाजात प्रश्न निर्माण करण्याचे काम राजकारणी करत असतात.त्यावर उपाय शोधण्याचे काम बुद्धीजीवी करत असतात.माझी भावकीत जगदीश आणि किशोरी सारखी चांगली काम करणारी माणसे निर्माण झाली.ते विद्याधनाचे काम करत आहेत, हे महत्वाचे काम आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!