दिवा : ( शंकर जाधव) दिवाच्या बेडेकरनगर मध्ये राहणारे वालविजय घोलप यांची पांच वर्षाची मुलगी शाळेतून येत असताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाली. समीक्षाला डोंबिवली येथील आस्था इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.या घटनेने जखमी मुलीचे नातेवाईक संतप्त झाले असून वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दिवा आगासान(बेडेकर नगर) येथे राहणारी विजय घोलप यांची पाच वर्षाची मुलगी सोमवारी पाच वाजता शाळेतून घरी येत होती. त्यावेळेस तिचा तिथे पडलेल्या विजेची तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसला .ही घटना घडत असताना तिच्या मदतीला कुणीही आले नाही. मात्र एका व्यक्तीने साहस करुन लाकडी स्टुल मोडून त्याच्या समिक्षाचे शरिरापासून वीजेची तार वेगळी केली.त्यामुळे समिक्षाचा जीव वाचला.मात्र ती गंभीरपणे जखमी झाली. समीक्षा इयत्ता पहिलीत शिकते.
वीज वाहणारी तार तुटल्यामुळे त्याची दखल न घेणाऱ्या संबधित विभागाबाबत कारवाई करणार असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. भविष्यात कुणा इतर मुलांवर असा दुर्दैवाने असा प्रसंग ओढू नये यासाठी कारवाई करणार असल्याचे तिच्या मामा दिपक लोखंडे यांनी सांगितले.
शाळकरी विद्यार्थी विजेची तारेने गंभीर जखमी.. वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
