महाराष्ट्र

कृषिमंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा; कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार

मुंबई, दि. 20 : शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टलमध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसित करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने यावेळी कृषिमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना डॉ. बोंडे यांनी केली. या पोर्टलमध्ये सध्या 11 योजनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना, दुष्काळी क्षेत्र विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अन्नधान्य, तेलबिया, ऊस, कापूस, राष्ट्रीय कृषी विकास योजना(वैयक्तिक लाभार्थी). या पोर्टलवर सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!