ठाणे

पालिकेच्या रुग्णालयात महिला रुग्णांना शुद्ध पाणी देण्यास मनाई

डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय आधीच वादाच्या भोवऱ्यात असताना आता या रुग्णालयात कर्मचारी आणि परीचारीला यांची मनमानी कारभार सुरु झाला आहे.मात्र उपचार घेताना कर्मचाऱ्यांचा ओरडा मिळू नये म्हणून येथील महिला रुग्ण त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करत नाही. विशेष म्हणजे या मनमानी कारभाराची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांना माहित असूनही त्यांनी आजवर यावर कारवाई केली नाही.डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला वाॅर्ड मध्ये रुग्णांना शुद्ध पाणी पिता यावे म्हणून पाणी शुद्ध करणारी मशीन लावण्यात आली आहे. मात्र हे शुद्धपाणी महिला रुग्णांना देण्यास मनाई करण्यात आली आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर महिला वाॅर्ड आहे.या वाॅर्ड मध्ये महिला, बाल कल्याण व दिव्यांग कल्याण समितीच्या वतीने पाणी शुद्ध करणारे पाणी शुद्ध करणारी मशीन लावण्यात आले आहे.मात्र या वाॅर्डमधील परिचारिका आणि कर्मचारी वर्ग यांनी पाणी शुद्ध करणारी मशीनवर कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही हात लावू नये` असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे.येथील महिलांना या मशीनमधील शुद्ध पाणी पिण्यास मनाई करण्यात आल्याचे यावरून दिसून येते. महिला रुग्ण शुद्ध पाण्याची मशीन व्यवस्थित हाताळत नसल्याची सबब येथील कर्माचाऱ्यांनी पुढे केली आहे. या मनमानी कारभारामुळे येथील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसाठी पिण्याचे पाणी दुकानातून विकत आणावे लागते.पाच-सहा दिवसांपूर्वी महिला वाॅर्डमध्ये `बाळंत विडा` देण्यासाठी महापौर विनिता राणे, महिला, बाल कल्याण आणि दिव्यांग कल्याणच्या सभापती रेखा चौधरी यासंह काही नगरसेविका आल्या होत्या. त्यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर हेही उपस्थित होते. यावेळी सावकारे यांच्या निदर्शनात सदर बाब येऊनही त्यांनी या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करणे टाळले.येथील डॉक्टर्सना याची माहिती असूनही त्यांनीही या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मनमानी कारभार करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचारीवर्गाबाबत कारवाई झाली पाहिजे असे येथील डॉक्टरांनी सांगितले.


                                                              पालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी…

पालिका रुग्णालयात रुग्णांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्ध करणारी मशीन बसविण्यात आली आहे. मात्र याचा वापर जर महिला रुग्णांना न होता रुग्णालयात मनमानी कारभारची चौकशी झाली पाहिजे. मनमानी करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचारीवर्गावर कारवाई होण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके आणि महापौर विनिता राणे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे महिला, बाल कल्याण व दिव्यांग कल्याण समितीच्या माजी सभापती दिपाली पाटील यांनी सांगितले. 


 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!