ठाणे दि.21 : जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना, सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विविध विभागांचा मध्ये सन 2018-19 मध्ये झालेला खर्च, सन 2018-20 साठी मंजूर नियतव्यय व त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबतचा आढावा घेतला. सन 2019-20 साठी सर्व मंजूर निधी पूर्णपणे खर्ची पडेल याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ दि. 31 जुलै पर्यंत सादर करावे, जेणे करुन निधी खर्च होईल. तांत्रिक मंजूरी प्राप्त करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी प्रास्ताविक करून गतवर्षी सुमारे 99.9% निधी खर्ची पडल्याचे सांगितले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.