ठाणे

सुरक्षेचा भार असणार्‍या पोलीस बांधवांना हक्काची चांगली घरे मिळाली पाहिजेत – आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत मागणी

कल्याण  :  नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीसआणि त्यांचे कुटुंबीय पोलीस वसाहतीत अत्यंत वाईट स्थितीत राहतात. याची माहिती राज्य सरकारला असताना त्याकडे गांभीर्याने पहिले गेले नाही. यावर भाजपचे कल्याण पश्चिमचेआमदार नरेंद्र पवार यांनी  सुरक्षेचा भार असणार्‍या पोलीस बांधवांना हक्काची चांगली घरे मिळाली  पाहिजेत अशी मागणी विधानसभेत केली.  आमदार  पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना कल्याणच्या विकासासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा दर्जा आणि नवीन इमारत आणि क्लस्टर योजना राबविण्याचीही  मागणी केली.
        पोलिस कर्मचार्‍यांच्या घरासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने सुमारे ३८,००० निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करत त्यासाठी २१८  कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या कल्याणमधील पोलीस वसाहतीचाही समावेश करावा. सुरक्षेचा भार असणार्‍या पोलीस बांधवांना हक्काची चांगली घरे दिली पाहिजेत. मी स्वतः त्या इमारतीची पाहणी केली आहे. सदर पोलीस वसाहतीचे तातडीने नूतनीकरण आणि नवीन इमारती बांधल्या पाहिजेत अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी सभागृहात बोलताना केली.  झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर परिसरात क्लस्टर योजना तातडीने राबविण्याची मागणीही यावेळी आमदार पवारांनी अधिवेशनात केली.  राज्य सरकारने ७७९  कोटी रुपये खर्चून एक अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्याचे ठरवले आहे. त्याच अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा दर्जा देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणीही अधिवेशनात बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी केली. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत राज्य सरकारचे अभिनंदन केले. पुढे बोलताना पवार यांनी अधिवेशन हे राज्याच्या विकासावर चर्चा करण्यासाठी आणि मुद्दे मांडण्यासाठी असते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभागृहात आपल्या ५५ मिनिटांच्या भाषणात तब्बल ३५ मिनिटे भाजपा आणि शिवसेनेने कुणाला मंत्रिपद दिले ? अशा तत्सम अवास्तव विषयांवर भाषण करत होते. बाकी विरोधकही सभागृहात केवळ सरकारवर टीका करण्यात व्यस्त आहेत. सरकारवर टीका जरूर करावी मात्र राज्यातील जनतेला हवा असलेला विकास आणि धोरणे सरकार राबवत असताना त्यामध्ये आपल्या सूचना देण्याऐवजी केवळ टीकेचे राजकारण हे विरोधकांना शोभणारे नाही असा टोला आमदार नरेंद्र पवार यांनी सभागृहात बोलताना लगावला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!