मुरबाड (प्रतिनिधी)- ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे संकल्पनेतून व गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांचे मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यात स्वयंम सिद्ध गाव ही नाविन्यपूर्ण ग्रामसमृध्दीची लोकचळवळ सुरु करण्यात आली आहे. शंभरटक्के आदिवासी वस्तीची गावे निवडून तेथे ग्रामस्थ व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सहभागातून गावाचे चित्र बदलण्याचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे याच मोहीमेचा पहिला शुभारंभ एकलहरे ग्रामपंचायत क्षेत्रातील मौजे वडगाव येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. मुरबाड पंचायत समितीचे अनेक विभागाने यात सक्रीय सहभाग घेतला होता पंरतु पशुसंवर्धन विभागाने या गावात पशुज्ञानाची एक गंगाच आनली होती.पशुसंवर्धन विषयक माहिती फलक,घोषवाक्य व माहिती पुस्तिका यांनी परिपूर्ण असे एक पशुदालन तयार केले होते. तसेच आदिवासी शेतकरी यांचे गायी म्हैशी,शेळया यांचेवर औषधोपचार,लसीकरण करण्यात येऊन आदीवासींचे पशुधनासाठी मुंबई येथील व्हेटेकिनाॅल या पशुऔषधी कंपणीचे वतीने विनामूल्य खनिज मिश्रण व कॅलशीयम पुरक औषधे वितरण करण्यात आली. तसेच येथे एक भव्य पशुसंवर्धन शिबीर घेऊन दोन म्हशीच्या पायातील वातावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.या गावात पशुसंवर्धन विभागाने शेळीगट व म्हैसगट लाभ दिलेल्या पशुधनाची पहाणी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी करुन त्यांना आपल्या हाताने हिरवा चारा खाऊ घातला व लाभार्थ्याशी थेट संवाद साधून पशुसंवर्धन विभागाचे कामाबद्दल समाधान व्यक्त केले. याच गावातून शेळीउदयोजक तयार करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार व मुरबाडचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी एक गाव शेळयांचे या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे एक प्रारुप तयार केले आहे व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत.स्वयंम सिद्ध गाव या लोकहितार्थ मोहिमेत मुरबाड पशुसंवर्धन विभागाने आपला उल्लेखनीय लक्षवेधी सहभाग नोंदवला असून या संकल्पनेतील सर्व निवडक गावामंध्ये मुरबाड पशुसंवर्धन विभागाची टिम स्वयंस्फूर्तीने पशुसंवर्धनातून ग्रामसमृध्दी करण्यासाठी या सर्व चळवळीत फक्त नोकरी म्हणून न पहाता सकारात्मक आनंदमयी लोकसेवा या तत्वाने कार्यरत राहील असे मत पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी व्यक्त केले आहे. मौजे वडगाव येथे राबविण्यात आलेल्या स्वयंम सिद्ध गाव संकल्पनेत प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर,आरोग्य अधिकारी डाॅ. श्रीधर बनसोडे,ग्रामसेविका सुप्रिया मुरबाडे,पशुसंवर्धन विभागाचे डाॅ. सुरेश भालेराव,डाॅ.श्रवणसिंग, मोहपे,पोटे,किशोरी पवार,भालेकर,पाटील व येथील सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.या पशुसंवर्धन शिबिराचे दालनाला माजी आमदार दिगंबर विशे,उपसभापती सौ.सिमा घरत ,माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत यांनी भेट दिली.मौजे वडगाव येथे आदिवासी वस्तीवर पशुसंवर्धन विभागाने आपली पशुगंगा पोहोचवून गावखेडयातील पशुक्रांतीचा एक अनोखा संदेशच दिला आहे अशी प्रतिक्रिया मुरबाडचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासी वस्तीवर पोहोचले पशुसंवर्धन
June 25, 2019
148 Views
2 Min Read

-
Share This!