ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू असलेले आठवडा बाजार तातेकाळ बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. दरम्यान संपूर्ण शहरभर फेरीवाले, हातगाड्यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडा बाजार भरत असल्यामुळे संपूर्ण रस्ता अडविला जात असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले.
त्याचबरोबर रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या चायनीजच्या गाड्या, उघड्यावर विक्री होणा-या अन्नपदार्थाच्या गाड्या यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देतानाच पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी उघड्यावर अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत दिले.