ठाणे

कल्याण – ठाणे – मुंबई जलवाहतूक प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या वतीने कल्याण – ठाणे – वसई तसेच कल्याण – ठाणे – मुंबई या राष्ट्रीय  जलमार्ग प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण आज जहाजरानी राज्यमंत्रीश्री. मनसुख मांडविया  यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आले.

राज्यमंत्री श्री. मनसुख मांडविया यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ३ महिन्यांमध्ये कल्याण – ठाणे – वसई या जलमार्गांच्या कामाला सुरुवात होईल, तसेच कल्याण – ठाणे – मुंबई या राष्ट्रीय जलमार्गाचे काम सुध्दा लवकरात लवकर सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

◆ यामुळे कल्याण_लोकसभा मतदारक्षेत्रातील नागरिकांचा ठाणे, वसई आणि मुंबई पर्यंतचा प्रवास सुखकर होणार. नागरिकांच्या वेळेची आणि पैश्यांची होणार बचत.

जल वाहतूकीमुळे रेल्वे तसेच रस्त्यांवरील रहदारीचा ताण तसेच यांमुळे होणारे हवेतील  प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी होणार.

गेल्या ३ वर्षांपासून सदर जल वाहतूक प्रकल्प सुरु व्हावा, याकरिता खासदार राजन विचारे तसेच ठाणे म.न.पा. आयुक्त संजीव जयस्वाल  यांच्यासोबत संसदेमध्ये, मा. केंद्रीय मंत्री तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन रु.१००० कोटींच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळवत रु.६५० कोटी मंजूर करुन घेतले होते.

या बैठकीस खासदार राजन विचारे, ठाणे म.न.पा. आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!