ठाणे : कल्याण ग्रामीणमधील डोंबिवली शहराला लागून असलेल्या शिळ पट्ट्यात वीज वितरणाचे कंत्राट टोरंट पॉवर कंपनीला देण्यात येणार आहे. मात्र या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना आता टोरंट कंपनीला नव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळ पट्ट्यात देसाई, शिळ यासह अनेक मोठी गावे आहेत. या गावांमध्ये आतापर्यंत महावितरण मार्फत वीजपुरवठा केला जात होता. मात्र आता टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला वीज वितरणाचा ठेका देण्यात आला असून ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. टोरंट पॉवरचा भोंगळ कारभार पाहता यामुळे आम्हाला मनस्ताप होण्याची जास्त शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच्या विरोधात मंगळवारी स्थानिक ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला आगरी समाज प्रतिष्ठान, आगरी कोळी संघटना यांनीही पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता हा निर्णय बदलला जातो का हे पाहणे महत्वाचे आहे.
नवी मुंबई महापालिकेकडून वगळलेल्या 14 गावांवर दोन महिन्यांनी काही तरी संकटाला सामोरे जावे लागत असते. उन्हाळाभर पाण्यासाठी आंदोलने करुन झाल्यानंतर आता कोणतीही कल्पना न देता आलेली ही कंपनी ग्रामस्थांना या परिसरांमध्ये नकोशी आहे. त्यामुळे प्रशासन या बाबतीत तातडीने कंपनीला ग्रामीण भागातून बाजूला सारते का हे पाहणे महत्वाचे आहे.
photo gallery :