महाराष्ट्र मुंबई

तलाठी पदाच्या भरतीसाठी २ जुलैपासून ई-महापरीक्षामार्फत १२२ केंद्रांवर परीक्षा

मुंबईदि. 29 : महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दि. जुलै ते 26जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील 122 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी 1800 3000 7766 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहर व मुंबई जिल्हा उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.

राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषय पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा / कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण-122परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसंदर्भात महाआयटीकडून परीक्षार्थींना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र  आणणे अत्यावश्यक आहे. यामध्ये 1. पॅन कार्ड 2.पासपोर्ट 3. वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence) 4. मतदान ओळखपत्र 5. मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बॅक पासबुक 6. आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्सई आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारली जाणार नाहीअशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत.
महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुरू असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना,काही गैरप्रकार होत नाही नायावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक (Observer) म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक (Controller) म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहेअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महापरीक्षा पोर्टलवरील तसेच परीक्षा प्रवेश पत्रावरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी/तक्रारी नोंदविण्यासाठी महापरीक्षा1800 3000 7766 हा टोल फ्री तसेच [email protected] या ईमेलवर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!