ठाणे दि.1 : कृषी दिनानिमित्त ठाणे जिल्हातील उत्कृष्ठ शेतकरी व उत्कृष्ठ बचत गटाचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मंजुषा चंद्रकांत जाधव या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुभाष पवार,जि.प.सदस्य गोकुळ नाईक, जि.प.सदस्य सुभाष घरत, जि.प.सदस्य राजेद्र विशे, जि.प.सदस्य वैशाली चंदे, जि.प.सदस्य कैलास जाधव, जि.प.सदस्य रेखा कंटे, पंचायत समिती सभापती भारती टेभे,जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते,विभागीय कृषी अधिकारी विकास पाटील,अति.मुकाअ,जि.प. ब.भि.नेमाने,कृषी विकास अधिकारी मनोज कुमार ढगे,कृषी उपसंचालक ए.डी. सावंत,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार,प्रकल्प अधिकारी प्रणमंतराव द दोडके.विस्तार अधिकारी संतोष पांडे,व ठाणे जिल्हातील बचत गट उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.मजुषा चंद्रकांत जाधव म्हणाल्या की,बचत गटाच्या माध्यमातून छोटया शेतकऱ्याचा विकास होवू शकतो. शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.बचत गटाच्या माध्यमातून महीला सक्षम होवू शकतात.बचत गटाच्या माध्यमातून सामुहीक शेती शक्य आहे. यावेळी सन्मानित शेतकरी-भगवान मोतीराम घोरड-मुरबाड,शिवाजी नामदेव भंडारी-अंबरनाथ,पुंडलिक गोविंद वेखंडे,विनायक भास्कर पाटील-भिवंडी,केशव तुकाराम देसले-कल्याण,देवू कमळू हंबीर-अंबरनाथ,तानाजी जानु गावंडा-अंबरनाथ,गंगाधर धाऊ वाख-शहापूर सत्कार झालेल्या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.
कृषी दिनानिमित्त ठाणे येथे शेतकऱ्यांचा सत्कार
