ठाणे

जिल्ह्यात हरित क्रांती घडवू – पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे दि.1 : प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा. मागील वर्षी लावलेली 80 टक्के झाडे आपण जगवली आहेत. या वर्षी आपण शंभर टक्के झाडे आपण जगवू व हरित ठाणे साकारण्याचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सार्वजनिक आरोग्य आणि कुंटुब कल्याण मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मौजे शीळ (गोठेघर) शीळफाटा ठाणे येथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलतांना केले.

राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मौजे शीळ (गोठेघर) शीळफाटा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्ष रोप लावून करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,आमदार सुभाष भोईर,मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे़ पोलीस उप अधिक्षक कुंभारे उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष भोईर ,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनीही वृक्षरोपण केले. या कार्यक्रमात सिबॉसिल कॉन्वेट स्कूलचे विद्यार्थ सहभागी झाले होते. या प्रत्येक विद्यार्थीनी एक झाड दत्तक घेऊन त्या झाडाची योग्य निगा राखून पुढील वर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी , सामाजिक, सेवाभावी संस्थांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ना. शिंदे यांनी केले. यावेळी वनविगाभाचे अधिकारी ,कर्मचारी,ग्रामस्थ, महिला व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता.

Photo gallery ………………

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!