ठाणे,दि2 मुंबईसह ठाणे,कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.त्यामुळे खबरदारीचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज (मंगळवार,दि.२ रोजी)सर्व शाळा, महाविद्यालयात, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
नागरिकांनी आपापल्या घरात सुरक्षितपणे रहावे, पर्जन्यमान स्थितीचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे.मुलांना,ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नये;असे आवाहन ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.