महाराष्ट्र

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शताब्दी रुग्णालयात मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

मुंबईदि. 2 : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.

मुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालीन यंत्रणा पूर्ण सक्रिय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री  श्री. फडणवीस म्हणाले,मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालीन यंत्रणा पोहोचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!