डोंबिवली :- ( शंकर जाधव ) दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या उर्दू शाळेची भिंत कोसळून भिंतीचा काही भाग लगतच्या दोन घरांवर पडल्याची काल रात्री साडे बारा च्या सुमारस घडली .या दुर्दैवी घटनेतवर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले आहेत.या घटनेनंतर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पाहणी करत पालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती लवकरात लवकर पाडण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. डोंबिवली विभागीय कार्यालयात `ग` आणि `फ` प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना याबाबत चांगले च सुनावले.त्यामुळे कल्याणच्या जीवितहानीनंतर पालिका आयुक्तांना आली जाग आली का ? असा प्रश्न कल्याण-डोंबिवलीकरांना पडला आहे.
पावसाच्या अनुसंगाने पालिका आयुक्त गोविंद बोडके हे फिरत आहेत. मंगळवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात पालिका आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पालिका आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना अतिधोकादायक इमारती लवकरात लवकर पाडण्याचे आदेश दिले. `ग` प्रभाग क्षेत्र अधिकारी चंदशेखर जगताप आणि `फ` प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी अतिधोकादायक इमारतीतील जल जोडणी तोडण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. यावर आयुक्त बोडके यांनी कारवाईचा जोर वाढवा आणि कारवाईल भेदभाव करू नका असे आदेश दिले.यावेळी नालेसफाई बाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त बोडके म्हणाले, नालेसफाईचे काम सुरु असून नागरिकांनी नाल्यात कचर आणि प्लास्टिक टाकणे बंद केले पाहिजे. गेल्या चार महिन्यापासून नालेसफाईचे काम सुरु आहे. आपत्कालीन परीस्थितीत नागरिकांनी पालिकेशी संपर्क करावा असे आवाहन आयुक्त बोडके यांनी यावेळी केले.
डोंबिवली विभागीय कार्यालयात उपायुक्तांचे काम अधिकारी करत आहे…
डोंबिवली विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ उपायुक्त कधी मिळणार असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी उपस्थित केल्यास डोंबिवली आणि कल्याण वेगळे नाही.डोंबिवली विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ उपायुक्त नसले तरी जनतेची कामे करण्यास अधिकारी वर्ग नेहमीच उपस्थित असतात असे पालिका आयुक्त बोडके यांनी सांगितले.दरम्यान अनेक वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन करून जनतेची म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यानंतरहि पालिका प्रशासनाने डोंबिवली विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ उपायुक्त दिले नाही.त्यामुळे नागरिकांना कल्याण मुख्यालयात हेलपाटे मारणे लागणार आहेत.आता मनसे यावर पुधिक भूमिका काय घेतील याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.