ठाणे

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वेळीच सुधारणा करावी  – महेश तपासे

डोंबिवली :  ( शंकर जाधव )  मुसळधार पावसाने काल मुंबईकरांचे हाल केले. परंतु आज मध्यरेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालवल्याने नागरीकांचे प्रचंड हाल केले. रेल्वेच्या या गलथान कारभाराचा करावा तितका निषेध कमीच आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
   आज सकाळी मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक केल्याने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काल पावसाने कहर केला होता त्यामुळे मुंबई तुंबली होती. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे हाल झाले होते. त्यामुळे आज पुन्हा कामावर जात असताना मध्य रेल्वेने केलेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका बसला आहे. कामावर वेळेत जात येत नसल्याने डोंबिवली, कल्याण या स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली. गाड्या वेळेत नसल्याने मिळेल त्या रेल्वेत घुसण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला. त्यात अनेक प्रवासी पडून जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याची जबाबदारी रेल्वेने घ्यावी अशी मागणीही तपासे यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!