डोंबिवली :- दि. ०४ ( प्रतिनिधी ) सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. ठाकुर्ली-कल्याण मध्ये पटणा कुर्ला एक्सप्रेस इंजिन मध्ये सकाळी साडे दहा च्या सूमारास हा बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला .दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास इंजिन बिघाड दुरुस्त झाल्यानंतर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. पावसाळा सुरू होताच मध्य रेल्वे ने नेहमीप्रमाणे नांगी टाकल्याचे दिसून आले .मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना चांगलाच फटका बसला .त्यातच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने रेल्वेने बुधवारी सकाळी रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने नेहमीच्या वेळेवर लोकल पकडण्यास स्टेशन वर आलेल्या चाकरमाण्यांची चांगलीच तारांबळ उडाली .त्यातून आज पुन्हा सकाळी साडे दहाच्या सुमारास ठाकुर्ली-कल्याण मध्ये पटणा कुर्ला एक्सप्रेस इंजिन मध्ये बिघाड झाल्याची घटना घडली व पुन्हा मुंबइच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली . घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या पथकाने घटना स्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरु केला. दुपारी १२.३० च्या दरम्यान बिघाड दुरुस्त केल्यनंतर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली . मात्र यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक संध्याकाळी पर्यत विस्कळीत झाली होती. याच दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद गती मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली होती .रेल्वेच्या अनागोंदी बाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाकुर्ली-कल्याण मध्ये पटणा कुर्ला एक्सप्रेस इंजिन मध्ये बिघाड
July 4, 2019
45 Views
1 Min Read

-
Share This!