ठाणे

डोंबिवलीत शारदा कंपनीच्या कापड गोदामाला आग

डोंबिवली :-  (  शंकर जाधव ) डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील शारदा कंपनीच्या कापड व कच्चामाल ठेवणार्या गोदामाला मध्यरात्री साडेतीन वाजता आग लागून सर्व सामान जळून खाक झाले आहे मात्र कोणतीही वित्त हानी झाली नाही. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी आग शाॅर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज आहे.

मानपाडा रस्त्यावर सांगाव येथील औद्योगिक विभागाच्या फेज दोनमध्ये शारदा कंपनीचे चार मजली गोदाम आहे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली तातडीने अग्निशमनदलाला बोलावण्यात आल्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ,उल्हासनगर,भिवंडीचे प्रत्येकी एक एक बंब घटनास्थळी दाखल झाले व आग ओटोक्यात आणली गोदामात तयार झालेले कापड व यासाठी लागणारा कच्चा माल ठेवलेला होता तो सर्व जळून खाक झाला मात्र या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठी झाली आहे मानपाडा पोलीसांनी अपघात म्हणून नोंद केली असून अधिक चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!