डोंबिवली : – ( शंकर जाधव ) कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरात राहणारे जनार्दन विशे ( ४०) हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरुन स्टेशन रोड परिसरातून मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जात होते. यावेळी, समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीने विशे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जनार्दन आणि त्यांची पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जनार्दन यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दांपत्य जखमी..
July 4, 2019
39 Views
1 Min Read

-
Share This!