ठाणे पोलीस दलाच्या कासारवडवली पोलिसांची उत्तम कामगिरी
ठाणे : पत्नी व तिच्या मामावर खुनीहल्ला करणाऱ्या पतीला कर्नाटक राज्यात अटक करण्यात आली. ही उत्तम कामगिरी ठाणे पोलीस दलाच्या कासारवडवली पोलीस पथकाने केली. या हल्ल्यात वापरण्यात आलेले ऊस तोडण्याचे धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.
शोभा अशोक हरिजन (40) ही मूळची कर्नाटक राज्यातील इंडी गावची असून, मामा दुन्डाप्पा कट्टिमणी याच्यासोबत ठाण्यात मजुरीसाठी आली होती. ठाण्यातील प्लॅटिनम इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी दोघेही मजुरी करत होते. दरम्यान, 5 फेब्रुवारी 2019 रोजी शोभाचा पती अशोक हरिजन (45) हा बांधकामाच्या ठिकाणी आला. शोभा हिला बळडबरीने गावी घेऊन जात होता. मात्र अशोक त्रास देत असल्याने शोभी त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. म्हणून तिचा मामा दुन्डाप्पा यानेही अशोकला विरोध केला. याचा राग अाल्याने संतापाच्या भरात अशोक बांधकामाच्या साईटवर घराबाहेर आला. तेथे असलेल्या ऊस तोडण्याच्या हत्याराने दुन्डाप्पा याच्या डोक्यावर व मानेवर तसेच शोभा हिच्या दोन्ही हातांच्या पंजावर, डोक्यावर वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दुन्डाप्पा यांनी कासरवडवली पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ३४/१९) भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून हल्लेखोर अशोकचा शोध सुरू केला.

या गुन्ह्याचा छडा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, परिमंडळ ५ चे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) काळदाते, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस. बी. जाधव, हवालदार , व्ही. एच. धुर्वे, हवालदार, आर. एस. चौधरी, पोलीस नाईक , आर. एस. महापुरे, पोलीस नाईक, व्ही. व्ही. जाधव आदी पथकाने उघडकीस आणला.