डोंबिवली :- ( शंकर जाधव ) २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकित इव्हीएम मशीनचा वापर केल्याने भाजपला बहुमत मिळाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केल्यास कॉंग्रेस हमखास जिंकणार मिळेल असा ठाम विश्वास पदे वाटप कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.तसेच अनेक नागरिक आणि सामाजिक समस्यांवर कॉंग्रेस नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील असे सांगण्यात आले.डोंबिवलीतील कॉंग्रेस मध्यवर्ती कार्यालयात डोंबिवली शहर ‘बी’ ब्लाँक काँग्रेस कमिटी पूर्व विभाग नवनिर्वाचित अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस प्रतिनिधी संतोष केणे,डोंबिवली पूर्व `बि` ब्लाँक अध्यक्ष सदाशिव शेलार, डोंबिवली पूर्व`ए` ब्लाँक अध्यक्ष नवेंदू पाठारे, माजी ब्लाँक अध्यक्ष रमेशचंद्र जैन, जनरल सेक्रेटरी अशोक कापडणे, गजानन ठाकूर, दिलीप गायकवाड, पाॅली जेकब, राहुल केणे,महेश केणे,प्रणव केणे,अजय पौळकर,वाल्मिकी पाटील,शंकर पिंगुळकर, कल्याण-डोंबिवली महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षा गुजर, संतोष देऊळकर, कॅप्टन मटू केणे,पंकज डुंबरे, वनुभाई दावडा आदी उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस प्रतिनिधी संतोष केणे म्हणाले. कॉंग्रेसचा कार्यकर्ता तळागाळातून निर्माण झाला पाहिजे.त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन उत्तमप्रकारे करता येते. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या नंतर अधिक जोमाने ते काम करतील.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून सामान्य नागरिकांना ज्वलंत समस्येसाठी सामोरे जावे लागत आहे.डोंबिवलीत खासदार , आमदार आणि मंत्री असून सुधा डोंबिवलीचे प्रश्न सुटले नाहीत.या विषयी कॉंग्रेस कल्याण डोंबिवलीत पुनः संघटीत होऊन सामान्य जणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहेत. त्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नऊ प्रभागात कार्यकर्त्यांचा फौजफाटा तयार झाला पाहिजे. येत्या विधानसभा निवडणूकित कॉंग्रेसच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता स्थानिक पातळीवर संघातील व्हायला हवा तरच कॉंग्रेस पक्ष वाढीस लागेल.त्यामुळे आज विविध पदांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.तर डोंबिवली पूर्व ब्लोक अध्यक्ष सदाशिव शेलार म्हणाले, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये कॉंग्रेसच्या विचारांची जागृती करण्यासाठी व पक्ष कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे कार्य कल्याण-डोंबिवलीत मोठ्या जोमाने सुरु झाले आहे. तर डोंबिवली पूर्व `ए` ब्लाँक अध्यक्ष नवेंदू पाठारे म्हणाले, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकित इव्हीएम मशीनचा वापर केल्याने भाजपला बहुमत मिळाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केल्यास कॉंग्रेस हमखास जिंकणार मिळेल.