मुंबई

शासनाच्या डीएसोओ स्पर्धेमध्ये सीबीएससी (CBSE) व आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या खेळाडूंची घुसखोरी

मुंबई :  महाराष्ट्र मध्ये क्रीडा संस्कृती रुजावी महाराष्ट्रातून ही ओलंपिक दर्जाचे खेळाडू घडले पाहिजेत महाराष्ट्राला क्रीडाची एक वेगळी परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजित करण्यात येत असतात त्यामधीलच राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये क्रीडा वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रतिवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने DSO स्पर्धेचे आयोजन शालेय स्तरावर केले जाते तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य स्पर्धा व राज्य स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला संघ निवडला जातो त्यामधूनच महाराष्ट्रातील सीबीएससी (CBSC) बोर्ड आणि आयसीएसई (ICSE) राज्यातील स्टेट बोर्ड च्या सर्व स्कूल यामध्ये प्रतिवर्षी सहभाग घेऊन खेळाडू आपले नशीब अजमावत असतात या स्पर्धेमध्ये सीबीएससी व आयसीएससी बोर्डच्या खेळाडूंनाही प्रवेश दिल्यामुळे राज्यातील स्टेट बोर्ड च्या शाळेतील खेळाडूंची कुचंबना होत असून दिल्ली बोर्डच्या शाळेच्या खेळाडूंपुढे स्टेट बोर्ड चा खेळाडूंचा निभाव लागत नाही म्हणून क्रीडा विभागाने स्टेट बोर्ड शाळांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित होणारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या फक्त राज्य शासनाच्या स्टेट बोर्ड, महानगरपालिका शाळा व जिल्हा परिषद शाळा यांच्यासाठीच ह्या स्पर्धा घेतल्या पाहिजेत तरच राज्यातील स्टेट बोर्ड च्या शाळेतील खेळाडू आपली गुणवत्ता या स्पर्धांमधून दाखवू शकतील राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील स्टेट बोर्डाच्या शाळांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डी एस ओ क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात या स्पर्धेमध्ये राज्यातील स्टेट बोर्डाच्या मराठी इंग्रजी व इतर भाषिक खेळाडू सहभाग घेत असतात व आपले नैपुण्य या स्पर्धे मधून दाखवायला त्यांना संधी मिळत असते परंतु या स्पर्धेमध्ये दिल्ली बोर्डाच्या सीबीएससी व आयसीएसई या बोर्डाच्या खेळाडूंनाही प्रवेश दिल्यामुळे या स्पर्धांमध्ये सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या शाळेतील खेळाडू काही खेळाचा अपवाद वगळला तर सर्व खेळांमध्ये आपले वर्चस्व गाजवत असतात त्यामुळे या स्पर्धांमध्ये राज्य शासनाच्या वतीने फक्त राज्यातील स्टेट बोर्डाच्या सहावी ते दहावी व अकरावी बारावी पर्यंतच्या खेळाडूंना फक्त संधी देण्यात यावी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या खेळाडूंनाही या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना आपले कसब दाखवता येत नाही सीबीएससी बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड या दोन्ही बोर्डाच्या वेगवेगळ्या व स्वतंत्र क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी होत असतात या स्पर्धांमधून सीबीएसई बोर्डाच्या स्पर्धेमध्ये फक्त सीबीएससी बोर्डाचे खेळाडू खेळू शकतात तर आयसीएससी बोर्डाच्या स्पर्धांमध्ये फक्त आयसीएससी बोर्ड चे खेळाडू खेळू शकतात जर या स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना प्रवेश दिला जात नाही तर राज्य स्पर्धांमध्ये दिल्ली बोर्ड खेळाडूंना का प्रवेश दिला जातो हा प्रश्न पालक विचारत आहेत आणि जर प्रवेश द्यायचा असेल तर दिल्ली बोर्डच्या शाळेतील खेळाडूंसाठी शासनाने वेगळ्या स्पर्धा सुरू कराव्यात असे पालक वर्गामध्ये एक सूर उमटत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!