डोंबिवली :- ( शंकर जाधव ) नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१९ या स्पर्धेत डोंबिवलीच्या पियाली तोषनीवाल यांनी मिस युनिव्हर्स २०१९ हा अव्वल दर्जाचा किताब पटकविला आहे. हा किताब पटकविणारी पियाली ही कल्याण – डोंबिवलीतील पहिली महिला आहे. पियालीचे मिसेस वर्ड होण्याचे स्वप्न आहे.
पियाली उच्चशिक्षित असून तीने एमबीए पूर्ण केले. इंजिनयरींगच्या परिक्षेतही तीने सूवर्ण पदक पटकविले आहे. व्हीएनएन एंटरटेमेंट या संस्थेने दिल्ली येथील आयटीसी हॉटेल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६० जणांनी सहभाग दर्शवला होता. या आधीही पियाली हीने अनेक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती. ही स्पर्धा ३ ते ६ जूलै रोजी पार पडली. सौंदर्य आणि बुध्दिमत्ता यावर आधारित ही स्पर्धा असल्याचे पियाली हीने सांगितले.या स्पर्धेचे भारतातील २५ शहरातून स्पर्धकांची निवड करण्यात आली असल्याचे पियालीने सांगितले.