डोंबिवली :- ( शंकर जाधव ) आगरी युथ फोरम व सुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १३ जुलैला दुपारी ४ते ८ या वेळेत कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर विनिता राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी स्थायी समिती माजी सभापती तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, आहारतज्ज्ञ डॉ. विनय वेलणकर, पाककला निपुण प्राची गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पावसाच्या सुरुवातीला रानामध्ये धरस, पेंढरे, भारंगी ठेशे, भुई, आवळा, नळीची, भाजी, भोकर, कडूकंद इत्यादी रानभाज्या उगवतात. मुरबाड, शहापूर तालुक्यातील आदिवासी महिला या रानभाज्या घेऊन प्रदर्शन स्थळी येणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. अनेक रानभाज्यांची भाजी भाकरी सुध्दा महिला आणणार आहेत.त्यांच्या चविष्ट व रुचकर भाज्यांची चव डोंबिवलीतील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. जंक फूड व मसाल्याचे पदार्थ खाउन आरोग्य बिघडते त्यापेक्षा आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या रानभाज्या उपयुक्त असतात. शरीरातील अनेक आजार व व्याधींवर या भाज्या उपयुक्त असतात. या भाज्या बनविण्याची सोपी रेसिपी याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.या भाज्यांच्या विक्री मुळे आदिवासी महिलांच्या पदरात आर्थिक लाभ पडणार आहे
डोंबिवलीत रानभाज्यांची माहिती प्रदर्शन
July 10, 2019
882 Views
1 Min Read

-
Share This!