डोंबिवली :- ( शंकर जाधव ) सोमवारी पार पडलेल्या डोंबिवली शहर युवक कॉंग्रेसची बैठकित कॉंग्रेस मजबुती करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी निरीक्षक आदित्य सावळेकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष राहुल काटकर, डोंबिवली विधानसभा युवक अध्यक्ष पमेश म्हात्रे, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मनीष देसले, ठाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुशील सैनी आणि कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कपिल सूर्यवंशी आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निरीक्षक आदित्य सावळेकर यांनी म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आगामी विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला जास्तीत जास्त यश आले पाहिजे.त्यासाठी जनतेच्या समस्या सोडवा.नागरिकांच्या संपर्कात रहा असे सांगितले.यावेळी डोंबिवली विधानसभा युवक अध्यक्ष पमेश म्हात्रे यांनी कॉंग्रेस पक्षाला मजबुती देण्यासाठी नागरिकांची साथ महत्वाची असल्याने युवक कॉंग्रेस सदैव जनतेसाठी काम करत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
डोंबिवली शहर युवक कॉंग्रेसची बैठकित कॉंग्रेस मजबुती करण्यावर चर्चा
July 16, 2019
27 Views
1 Min Read

-
Share This!